शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushma Andhare : "प्रिय उदयभाऊ, उपमुख्यमंत्री पदाची तुमची सुप्त महत्वकांक्षा मी..."; सुषमा अंधारेंचा खोचक टोला
2
पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू; कुटुंबीयांकडून हत्येचा गंभीर आरोप, वरळी पोलीस ठाण्यात आक्रोश
3
शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे सोन्याला पुन्हा भाव! मात्र, चांदी घसरली; आजचे दर काय?
4
युद्धाचा भडका उडणार, अमेरिका 'या' देशात सत्तांतर घडवण्याच्या तयारीत?; विमाने रद्द, युद्धनौका, लढाऊ विमाने तैनात
5
IND vs SA : कोण आहे Senuran Muthusamy? कसोटी पदार्पणात 'विराट' विकेट; भारताशी खास कनेक्शन अन् बरंच काही
6
४०व्या वर्षी दुसऱ्या बाळाला जन्म देणार सोनम कपूर, हटके मॅटर्निटी फोटोशूटने वेधलं लक्ष
7
कर्मचारीहिताचा मोठा निर्णय! 'गिग वर्कर्स'नाही मिळणार PF-ग्रॅच्युइटी; नवीन लेबर कोडचे ३ महत्त्वाचे फायदे!
8
टॉर्चर अन् चॅटिंगने १० महिन्यातच संपवला संसार; पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीच्या मृत्यू प्रकरणात गूढ वाढले
9
काळाचा घाला! नैनीतालमध्ये भीषण अपघात, खोल दरीत पडली कार; तिघांचा मृत्यू, १ जखमी
10
"लढाई करून जिंकण्याचा दम नाही म्हणूनच..."; दिल्ली स्फोटावरून लष्करप्रमुख द्विवेदींनी पाकिस्तानचे काढले वाभाडे
11
टीम इंडियावर वनडेत नवा कर्णधार शोधण्याची वेळ! कोण घेणार शुभमन गिलची जागा?
12
जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकांवर टांगती तलवार; सुप्रीम कोर्टात काय होईल? इच्छुकांची घालमेल
13
VIDEO: हरलेल्या संघाच्या कॅप्टनला विचारलं- "जिंकल्यावर कसं वाटतंय?"; चूक लक्षात येताच....
14
"तू आई-वडिलांना छोट्या गोष्टी..."; फिजिओथेरपिस्टचा होणाऱ्या नवऱ्याला मेसेज, का संपवलं आयुष्य?
15
५ डॉक्टरांनी २६ लाख जमवले; दिल्लीतील स्फोट फक्त ट्रेलर, अनेक शहरांत हल्ल्याची योजना, NIA चा खुलासा
16
आमदार आल्यानंतर उभे न राहिल्याने डॉक्टरवर कारवाई; हायकोर्टानं काढली सरकारची खरडपट्टी, म्हणाले...
17
VIDEO: तुझे लागे न नजरिया... श्रेयंका अन् जेमिमाचा 'टीम इंडिया'च्या पोरींसोबत भन्नाट डान्स
18
नाशिक: तस्कर टोळीतील एकाने वनपथकाच्या हाती दिल्या तुरी; बाऱ्हे वनविश्रामगृहातून ठोकली धूम
19
आजचे राशीभविष्य, २३ नोव्हेंबर २०२५: यश मिळेल, प्रतिष्ठा उंचावेल; पण पाण्यापासून सावधान!
20
VIDEO: स्मृती मंधानाचा होणाऱ्या पतीसोबत अफलातून डान्स, लग्नाआधी 'संगीत'मध्ये तुफान धम्माल
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवकांच्या ‘फिरती’ला बसणार चाप, विभागीय आयुक्तांचे आदेश : ग्रामपंचायतीत उपस्थिती बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 01:11 IST

कोल्हापूर : ऊठसूट बैठका घेणाऱ्या अधिकाऱ्यांना आणि ग्रामसेवकांच्या ‘फिरती’ला चाप लावण्याचा निर्णय पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी घेतला असून, सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत त्यांना ग्रामपंचायतीमध्ये थांबणे

ठळक मुद्दे ग्रामसेवकांच्या ‘फिरती’ला बसणार चाप विभागीय आयुक्तांचे आदेश : सकाळी ९ ते सायंकाळी ५ ग्रामपंचायतीत उपस्थिती बंधनकारक

समीर देशपांडे ।कोल्हापूर : ऊठसूट बैठका घेणाऱ्या अधिकाऱ्यांना आणि ग्रामसेवकांच्या ‘फिरती’ला चाप लावण्याचा निर्णय पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी घेतला असून, सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत त्यांना ग्रामपंचायतीमध्ये थांबणे बंधनकारक केले आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि पुणे जिल्हा परिषदांमध्ये या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

पुण्यात झालेल्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये ग्रामसेवकांच्या उपस्थितीबाबत गांभीर्याने चर्चा झाली होती. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामसेवक अधिकाधिक वेळ ग्रामपंचायतीमध्ये असणे आवश्यक असल्याचा सूर व्यक्त करण्यात आला होता. याला अनुसरून विभागीय आयुक्तांनी सविस्तर आदेश दिले असून, आता केवळ प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या सोमवारीच ग्रामसेवकांना पंचायत समितीमध्ये बैठकीसाठी यावे लागणार आहे.

एका ग्रामसेवकाकडे शक्यतो एकापेक्षा अधिक ग्रामपंचायतींचा कारभार देऊ नये, रजेवर गेलेल्या ग्रामसेवकाचा कार्यभार लगतच्या ग्रामसेवकाकडे द्यावा, केवळ पहिल्या, तिसºया सोमवारी तालुक्याला आढावा बैठक घ्यावी, त्याची विषयसूची तयार करून आधीच पाठवावी, सकाळी १० वाजता ही बैठक सुरू करावी, याच दिवशी ग्रामसेवकांनी विभागप्रमुखांच्या कामाच्या पाठपुराव्यासाठी भेटी घ्याव्यात. या आढावा सभेला हजर राहण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी प्रत्येक तालुक्यासाठी एक पालक अधिकारी नेमावा, असे या आदेशात म्हटले आहे.अपवादात्मक परिस्थितीत विस्तार अधिकाऱ्यांच्या परवानगीनेच ग्रामसेवकांनी मुख्यालय सोडावे, प्रत्येक ग्रामपंचायतीसमोर ग्रामसेवकाच्या कामाचा दिवस व पंचायत समिती भेटीचा दिवस फलकावर लिहावा.वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी निर्णयविभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, गावोगावी दौरे करताना ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक फार वेळ उपस्थित नसतात, अशा ग्रामस्थांच्या तक्रारी येत होत्या. ग्रामसेवकांशी बोललो तर ते म्हणतात, एवढ्या योजना आहेत की, त्या कामांसाठी आणि आढावा बैठकांसाठी आम्ही पंचायत समितीमध्ये जास्त वेळ असतो. प्रत्येक खात्याचा अधिकारी स्वतंत्रपणे ग्रामसेवकाला बोलावत असल्याने त्यांच्या वेळेचा अपव्यय होतो. म्हणूनच याबाबत साकल्याने विचार करून विकासकामे वेळेत व्हावीत आणि ग्रामसेवकांचीही अनावश्यक धावपळ वाचावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.बैठकीचे वेळापत्रकही निश्चितमहिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या सोमवारी होणाºया पंचायत समितीमधील बैठकीचे वेळापत्रकही विभागीय आयुक्त कार्यालयाने तयार करून दिले आहे. सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत कोणत्या विभागांचा आढावा घ्यायचा आणि त्यामध्ये अधिकाºयांनी नेमके काय योगदान द्यायचे याची सविस्तर माहिती या परिपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.पाच जिल्ह्यांत ३५०० ग्रामसेवकपुणे विभागातील पाचही जिल्ह्यांत ६५०० गावे असून ५५०० ग्रामपंचायती आहेत; तर ३५०० ग्रामसेवक कार्यरत आहेत. २००० ग्रामसेवकांच्या जागा रिक्त असल्याने एका ग्रामसेवकाकडे तीन-चार ग्रामपंचायतीही देण्यात आल्या आहेत. त्याचा पुनर्विचार आता करण्यात येणार आहे.शेतकरी, ग्रामस्थांची सोय महत्त्वाचीग्रामीण भागामध्ये सकाळी लवकर शेतकरी, ग्रामस्थ आपल्या कामासाठी निघून जातात. नंतर ग्रामसेवक येतात. त्यामुळे कामात दिरंगाई होते; म्हणूनच यापुढे ग्रामसेवकांनी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत ग्रामपंचायतीमध्ये उपस्थित राहणे अनिवार्य करण्यात आले आहे.